पुणे : (Pune Metro News : गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक (Garware to Ruby Hall) स्थानक यादरम्यान मेट्रो (Metro ) मार्गिकेचं काम जवळपास पूर्ण झाले आहे. मार्च अखेरपर्यंत या मार्गिकेचं काम पूर्ण होणार आहे. तसेच (Garware to Ruby Hall from April) एप्रिलमध्ये मेट्रो पुणेकरांच्या सेवेत येणार आहे. (Pune Metro News)
गरवारे महाविद्यालय स्थानक ते रूबी हॉल क्लिनीक या दरम्यानची स्थानके
गरवारे महाविद्यालय स्थानक ते रूबी हॉल क्लिनीक स्थानक या दरम्यान डेक्कन, छत्रपती संभाजी महाराज उद्यान, पुणे महापालिका, शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय, आरटीओ, पुणे रेल्वे स्थानक ही स्थानके आहेत. गरवारे स्थानक ते रुबी हॉल क्लिकन स्थानक यादरम्यान मेट्रो मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आहे. मार्च अखेरीस हे काम पूर्ण होईल, असा अंदाज आहे. त्यानंतर केंद्रीय समितीचा पाहणी दौरा होणार आहे. एप्रिलमध्ये या मार्गावर मेट्रो धावण्याची शक्यता आहे.
गरवारे महाविद्यालय स्थानक ते रूबी हॉल क्लिनिक स्थानक या मार्गिकेअंतर्गत डेक्कन आणि छत्रपती संभाजी महाराज उद्यान स्थानकाचे काम जवळपास पूर्णत्वाकडे आले आहे. डेक्कन आणि छत्रपती संभाजी महाराज उद्या या स्थानकांची वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. या दोन्ही स्थानकांची रचना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्याच्या पगडीच्या आकाराप्रमाणे करण्यात आली आहे. या दोन्ही स्थानकाचे काम पूर्ण झाल्यानंतर एप्रिलमध्ये मेट्रो पुणेकरांच्या सेवेत येणार आहे.
दरम्यान, गरवारे ते रुबी हॉल क्लिनिक यादरम्यानच्या मार्गिकेवर प्रवासी सेवा सुरु झाल्यानंतर नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता (एफएस रस्ता), जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर, पुणे महापालिका, आरटीओ, वाडिया महाविद्यालय आदी महत्त्वाची ठिकाणे मेट्रोद्वारे जोडली जाणार आहेत.