हडपसर : हडपसर मधून स्वारगेट, कात्रज आणि खराडी मार्गावर मेट्रो चालवली जाणार आहे. यासाठी प्रयत्न केले त्याला यशही आले. पुढे हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड या मार्गावरही मेट्रोचा विस्तार होणार आहे. याचा सविस्तर प्रकल्प आराखडा म्हणजेच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट, डीपीआर देखील तयार झाला आहे. मेट्रो ही हडपसरच्या विकासातील गुरू किल्ली असणार आहे. भविष्यातील ही महत्त्वाची कामे होण्यासाठी महायुतीचे सरकार स्थापन होणे गरजेचे आहे.तेव्हा घड्याळाच्या चिन्हापुढील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन महायुतीचे उमेदवार चेतन तुपे पाटील यांनी केले.
हडपसर विधानसभा मतदार संघातील प्रत्येक भागात महायुतीचे उमेदवार चेतन तुपे पाटील यांना मतदारांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी औक्षण करून स्वागत केले जात आहे. दरम्यान मतदारांशी संवाद साधताना चेतन तुपे पाटील बोलत होते. तुपे पाटील पुढे म्हणाले, की राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत हडपसर ते स्वारगेट, हडपसर – कात्रज, हडपसर – खराडी मेट्रो मार्गिकांना मान्यता मिळवून दिली. पुणेकरांना शास्तीकरातून माफी आणि नव्याने समाविष्ट गावांना मिळकत करातून सवलत करून दिली. साडेसतरानळी ,केशवनगर पाणीपुरवठा, मांजरीच्या पाणी प्रश्नाबाबत लष्कराकडे पाठपुरावा करून प्रश्न सोडविला.स्वर्गीय विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह उभारणी केली.
नागरी वन उद्यान निर्मिती केली.संपूर्ण मतदार संघात अंतर्गत रस्ता, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट,पाणी या मूलभूत सुविधा निर्माण करून देताना करोडो रुपयांचा निधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आमदार योगेश अण्णा टिळेकर तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनीही मतदारसंघात मोठा निधी उपलब्ध करून विकास कामे केली आहेत. भविष्यातही मतदारसंघात अनेक कामे मार्गी लागतील. तेव्हा अजितदादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला ही मोठी संधी आहे .सर्वांनी याचा फायदा घेऊन घड्याळाला विजयी करायचे आहे. सर्वांनी एकदिलाने काम करावे. विजय आपलाच होणार आहे. असा आत्मविश्वासही महायुतीचे उमेदवार चेतन तुपे पाटील यांनी व्यक्त केला.
मतदानाचा दिवस जस-जसा जवळ येत आहे. तसतसे महायुतीचे उमेदवार चेतन तुपे पाटील यांना मतदार संघातून मतदारांचा प्रतिसाद वाढताना दिसत आहे. कात्रज संतोषनगर पासून मांजरी बुद्रुकपर्यंत ते महंमदवाडीपासून मुंढवा-केशवनगरपर्यंत ठीक ठिकाणी मोठ्या उत्साहाने मतदार स्वागत करत आहेत. ज्येष्ठ नागरिक आशीर्वाद देत आहेत. तर लाडक्या बहिणीही औक्षण करत आहेत.