राहुलकुमार अवचट
यवत : ग्राहक कल्याण फाऊंडेशन पुणे जिल्ह्याच्या वतीने, दौंड, इंदापूर ,बारामती व शिरूर तालुक्यांच्या बैठकीचे आयोजन चौफुला येथील श्री क्षेत्र बोरमलनाथ मंदिर, केडगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते .
प्रमुख मार्गदर्शक ग्राहक कल्याण फाउंडेशनचे राज्यकारणी सदस्य असलम तांबोळी यांनी ग्राहकांवर होणारे अन्याय व ग्रामपंचायतच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन केले तसेच पुणे जिल्हाध्यक्ष नरहरी गांजवे यांनी संघटनेच्या ध्येय-धोरणासंदर्भात मार्गदर्शन केले.
दौंड, बारामती, इंदापूर या तीनही तालुका कार्यकारिणी जाहीर करून नियुक्तीपत्र नरहरी गांजवे, असलम तांबोळी, उपाध्यक्ष मारुती पठारे, अनिल नेवसे, प्रसिद्धी प्रमुख सुनील थोरात, जिल्हा कार्यवाहक साठे, हनुमंत कदम यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी बारामती तालुका अध्यक्षपदी सुशील कुमार अडागळे, उपाध्यक्षपदी मल्लिकार्जुन हिरेमठ, सहसचिवपदी शंतनू साळवे, कोषाध्यक्षपदी हनुमंत खोमणे, कार्यवाहक श्रीमंत मांढरे, कार्याध्यक्ष प्रमोद शिंदे, संपर्कप्रमुख अजय पिसाळ व प्रसिद्धी प्रमुख माधव झगडे, याबरोबरच इंदापूर तालुका अध्यक्षपदी नंदकुमार गुटाळ, उपाध्यक्षपदी पोपट डोंगरे, कार्याध्यक्षपदी अनंता ठवरे, कार्यवाहकपदी राजाराम राऊत, सदस्यपदी प्रकाश वाघमोडे, संतोष नरोटे तर दौंड शहर महिला अध्यक्षपदी रोहिणी ढवळे यांना नियुक्ती देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा महिला प्रतिनिधी सविता सोनवणे, स्मिता बाबरे, रुकसाना शेख, ग्राहक कल्याण फाउंडेशनचे दौंड तालुका अध्यक्ष दिगंबर नेवसे, उपाध्यक्ष अमोल दिवेकर, भगवान साळुंखे, जनार्दन मोटे, बबन कोकरे, अशोक शिंदे, प्रशांत क्षिरसागर, राहुल पवार, राजेंद्र अडागळे, शिवाजी मोटे यावेळी उपस्थित होते.
यावेळी ग्राहक कल्याण फाउंडेशन दौंड तालुक्याच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करण्यात आले.