लोणी काळभोर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘महापरिनिर्वाण दिनामिनित्त व शौर्य दिनामिनित्त पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करण्यात आलेल्या आहे. सर्वांनी कायद्याचे पालन करावे. कायदा कोणीही हातात घेऊ नये. तसेच जर कोठे गैप्रकार घडत असेल तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमर काळंगे यांनी केले आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात शनिवारी (ता.30) सायंकाळी आढावा बैठक झाली. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक अमर काळंगे यांनी वरील आवाहन केले. यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे, गोपनीय विभागाचे पोलीस हवालदार रवी आहेर, लोणी काळभोर येथील सिद्धार्थ तरुण मंडळाचे अध्यक्ष विनायक कांबळे, प्रल्हाद कांबळे, राजेंद्र दाभाडे, दीपक आढाळे, अभिजीत पाचकुदळे, संजय भालेराव, गणेश कांबळे, मारुती कांबळे, रमेश गायकवाड, सोमनाथ जाधव, दिनेश कांबळे, सूर्यकांत काळभोर, अमोल लोंढे आदी पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी भीम अनुयायी व लोणी पोलीस यांच्यात चर्चा झाली. यावेळी भीम अनुयायी यांनी प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी सांगितल्या. तसेच काही समाजकंटक शौर्यादिनाच्या दिवशी चुकीचे मेसेज व्हायरल केले आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. तेव्हा पोलिसांनी सांगितले की, त्यासाठी पोलीस मुख्यालयाच्या अंतर्गत एक सायबर विभाग आहे. तो अशा मेसेज टाकणाऱ्यांवर करडी नजर ठेवून आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. व पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी वेळेवर सर्वोतोपरी मदत करण्यात येईल.
दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘महापरिनिर्वाण’ दिनामिमित्त लाखो भीम अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर 6 डिसेंबरला दर्शन घेण्यासाठी जातात. तसेच 1 जानेवारीला पेरणे फाटा येथील ऐतिहासिक विजय स्तंभाला नतमस्तक होऊन अभिवादन करण्यासाठी येतात. भीमअनुयायांना प्रशासनाच्या सुविधा मिळाव्यात. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन नये. या दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये. या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.