Mcoca | पुणे : अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविणार्या सराइतासह टोळीविरुद्ध मोक्कानुसार कारवाई केली आहे.
अभिषेक रोहिदास जाधव (वय 23, रा. एरंडवणे, टोळीप्रमुख), तन्मय तानाजी इटकर (वय 19, रा. नर्हे रस्ता), ईश्वर खंडूलाल चव्हाण (वय 18, रा. डहाणूकर कॉलनी, कोथरूड), सुजल संजय कदम (वय 18, रा. गोसावीवस्ती, नवीन शिवणे, कर्वेनगर) आणि पीयूष सतीश जाधव (वय 20, रा. वारजे) अशी मोक्कानुसार कारवाई केलेल्यांची नावे आहेत.
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्कानुसार केलेली ही 20 वी कारवाई आहे…
सराईत जाधव टोळीने 23 फेब्रुवारीला नंदू अनंता जाधव (वय 22) याचा पाठलाग करून धारदार हत्याराने वार करून ठार मारले. आरोपी अभिषेक जाधव याने खुनासाठी नवीन साथीदार सोबत घेऊन संघटित टोळी तयार केली. अलंकार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी टोळीविरुद्ध मोक्का प्रस्ताव तयार केला.
अपर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी मोक्काच्या कारवाईचे आदेश दिले. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Police | पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह विजेत्यांचा पोलीस महासंचालक संजय कुमार यांच्या हस्ते गौरव