Maval News : तळेगाव : दहा तारखेच्या आत कामगारांना कामावर न घेतल्यास तळेगाव एमआयडीसी ठप्प करणार आहे. असा कडक इशारा आमदार सुनील शेळके यांनी ह्युंदाई कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
आमदार सुनील शेळकेंचा ह्युंदाई कंपनी प्रशासनाला इशारा
यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले, सरकार तुमच्याकडे गांभीर्याने बघत नाही. अनेक मंत्र्यांसोबत बैठका झाल्या. आता बैठका किती आणि कोणाकडे लावायच्या? हादेखील प्रश्न पडलेला आहे. काहीतरी निर्णय येईल म्हणून तुम्ही कामगार आमच्याकडे अपेक्षेने पाहत असता. (Maval News) आज तुमचा संयम सुटल्याने राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंती दिवशी रस्त्यावर उतरलात. मी सत्तेत आहे, म्हणून सत्तेची बाजू घेत नाही. वस्तुस्थिती सरकारने स्वीकारली पाहिजे. कामगारांचे म्हणणं सरकारने ऐकलं पाहिजे. असेही शेळके बोलताना म्हणाले.
तळेगाव एमआयडीसी येथील जनरल मोटर कंपनी बंद झाल्यानंतर ह्युंदाई कंपनीने काम सुरू केले आहे. जनरल मोटार आणि ह्युंदाईच्या एमडीला सांगतो. आमचा कंपनीला विरोध नाही. (Maval News) त्यांच स्वागतच आहे. जोपर्यंत भूमिपुत्रांच्या कामांचा प्रश्न मिटत नाही. तोपर्यंत कुठलंही काम कंपनीत करता येणार नाही. असा कडक इशारा आमदार सुनील शेळके यांनी ह्युंदाई कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
दरम्यान, तळेगाव एमआयडीसी (ता. मावळ) येथील जनरल मोटर ही कंपनी बंद पडली असून यामुळे हजारो कामगारांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. (Maval News) त्या कंपनीच्या जागी ह्युंदाई कंपनी सुरू झाली आहे. परंतु, संबंधित कामगारांना कामावर घेण्याबाबत संभ्रम आहे. यामुळेच हजारो कामगार रस्त्यावर उतरले होते.
तुम्ही आज सर्व रस्त्यावर उतरला आहात. ही परिस्थिती बघून राज्यकर्त्यांना घाम फुटक्याशिवाय राहणार नाही. आज २ तारीख आहे, राज्यसरकारने १० तारखेच्या आत जर निर्णय घेतला नाही. यानंतर सर्व गाड्या-घोड्या बंद करणार. एक नाही चार कंपन्या गेल्या तरी चालतील काही फरक पडत नाही.
सुनील शेळके (आमदार -मावळ, पुणे)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Maval News : विजेची तार अंगावर पडल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू ; मावळ तालुक्यातील घटना..
Maval News : खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला जामीन मंजूर ; वडगाव मावळ न्यायालयाचा निर्णय
Maval News : पवना धरणात ४० वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू ; पवन मावळातील चावसर गावातील घटना..