Maval News : तळेगाव दाभाडे : (पुणे) : शेतात भात पिकातील गवत काढताना अंगावर विद्युत वहिनी तुटून पडल्याने तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी (ता. ०५ ) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. Maval News
श्रीकांत गणपत गायकवाड (रा. कांब्रे नामा (ता. मावळ जि. पुणे) असे विजेच्या शॉक लागून जागीच मृत्यू झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत गायकवाड हा खाजगी कंपनीत चिंचवड येथे काम करत होता. शनिवारी व रविवारी सुट्टी असल्याने शेतात नेहमीप्रमाणे त्यांच्या शेतात भातातील गवत काढत असताना, अंगावर विद्युत वाहिनी तुटून पडली. त्यामध्ये त्याचा विजेच्या शॉकने जागीच मृत्यू झाला. अशी माहिती बाजूच्या शेतात काम करणाऱ्या व्यक्तीने कुटुंबियांना दिली. सदर माहिती कुटुंबियांनी पोलिसांना दिली. Maval News
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. यावेळी डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे सांगितले.
दरम्यान, या घटनेने कांब्रे नामा तसेच नाणे मावळात शोककळा पसरली आहे. या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी ग्रामस्थ एकवटले आहे. कामाला गेला त्यांचा करुण अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. Maval News