सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक
पुणे: तनिषा भिसे यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची सखोल चौकशी करून, दोषीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी मातंग नवनिर्माण सेनेच्या वतीने पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी संघटनेच्या वतीने दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाचा निषेध करण्यात आला. मातंग नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मस्कु शेडगे, राजेंद्र कसबे, सुनील रिठे, संदीप भोंडे, दिगंबर नेटके, आबा खवले, आकाश भोंडे, सनी भोंडे, महेंद्र खंडाळे आदी उपस्थित होते.
पुणे येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे यांना’ आधी पैसे भरा’ मग उपचार करा’ असे सांगत उपचारास नकार दिला, त्यामुळे वेळेत उपचार न झाल्याने, त्यांचा मृत्यू झाला. तनिषा भिसे यांचे पती सुशांत भिसे हे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता कक्षामार्फत प्रयत्न केले तरीही, रुग्णालयाच्या मुजोर प्रशासनाने त्यांना सहकार्य केले नाही. असा आरोप भिसे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर मातंग नवनिर्माण सेनेच्या वतीने सासवड येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.