पुणे : रयत शिक्षण संस्थेच्या गर्ल्स इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागांमध्ये माता पूजनाचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थिनी व त्यांच्या माता पालकांना या कार्यक्रमासाठी बोलावण्यात आले होते. इयत्ता नर्सरी ते पाचवीच्या विद्यार्थिनींनी माता ही पहिली गुरु असते यामुळे आईचे पूजन केले.
माध्यमिक विभागामध्ये वक्तृत्व स्पर्धा व गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनींनी गुरुपौर्णिमा या विषयावरती त्यांचे विचार व्यक्त केले तसेच काही विद्यार्थिनींनी गुरुपौर्णिमा व गुरूंशी संबंधित गीतांचे गायन केले. या कार्यक्रमाला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका झीनत सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच विद्यालयाचे विभाग प्रमुख सुनील राख, सुवर्णा कानडे व वैशाली महाले यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी व माता पालक यांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता.