पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. अशातच धक्कादायक बातमी समोर आली आहे. क्युनेट बिझनेसच्या नावाखाली पतीसह चार जणांनी विवाहितेची 5 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. तसेच, फसवणूक झालेले पैसे तू माहेराहून आणले नाही तर तू हे पैसे जुगारात हरली, असे सर्वांना सांगेल, अशी धमकी दिल्याने पत्नीने आत्महत्या केली आहे. ही घटना 1 डिसेंबर 2019 ते 21 ऑक्टोबर 2024 या कालावधीत रावेत येथील अर्बन स्कायलाइन येथे घडली आहे. विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल झाल आहे.
कविता देशमुख-घागरे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. प्रकाश गजानन देशमुख (वय 32, रा. सिंधी मेघे आकरे लेआऊट, जि. वर्धा) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला कविता देशमुख-घागरे या आरोग्य सेविका म्हणून काम करीत होत्या. तिची क्युनेट बिझनेसच्या माध्यमातून आरोपींशी ओळख झाली. या सर्वानी मिळून तिच्याकडून 5 लाख 40 हजार रुपये घेतले. परंतु हे पैसे परत न देता तिची फसवणूक केली. तसेच, मृत महिला कवितेचा पती गुंजल याने तिला पैसे बुडाले कसे, सगळे पैसे तुझ्या आईकडून आण, नाहीतर मी तुला घरात ठेवणार नाही, असे सतत बोलून तिला मानसिक त्रास देत होता. बुडालेले पैसे तुझ्या आईकडून आणले नाहीतर, तु जुगारामध्ये पैसे हरली, अशी तुझी सगळीकडे बदनामी करेल, असे बोलून मारहाण करून व मानसिक त्रास दिला. यातून नैराश्य आल्याने कविताने गळफास घेऊन आत्महत्या केली.
जळगाव येथील शासकीय नर्सिंग महाविद्यालयातील नर्स टिचर, राहणार जळगाव, विवेक अवचार (रा. स्टाफ नर्स, ई.एस.आय.सी.हॉस्पीटल, कांदिवली), थेरगाव हायलाइफ सोसायटीत राहणारी महिला आरोपी, अनुप वासनिक (रा. क्रिस्टाईन ट्रोलाईफ, शंकर कलाटनगर) आणि मयत विवाहितेचा पती गुंजल सदाशिव घागरे (रा. नवनीतनगर, नागपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
दरम्यान, विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल झाल आहे.