Marriage Ceremony | पुणे : श्री क्षेत्र ओझर येथे भव्य सामुहिक विवाह सोहळा मोठया थाटामाटात पार पडला. या सोहळ्यात एकूण १७ जोडपी विवाह बद्ध झाली. अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे यांनी दिली.
ह. भ. प. विकास महाराज हगवणे, अध्यक्ष मुरलीधर घेगडे, उपाध्यक्ष रघुनाथ मांडे, सरपंच जगन्नाथ कवडे, अध्यक्ष मंगलमूर्ती पतसंस्था प्रकाश मांडे, उपाध्यक्ष सुर्यकांत रवळे, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप कवडे, दत्तात्रय कवडे, उपसरपंच सुरेश टेभेंकर, ग्रामविकास अध्यक्ष संतोष मांडे, महेश कवडे, रघुनाथ कवडे, दत्तात्रय ठुबे, खजिनदार किसन मांडे. विश्वस्त चिंतामण कवडे या मान्यवरांच्या शुभहस्ते गणेश पुजन झाले.
सामूहिक विवाह सोहळ्यासाठी फुलांची सजावट तसेच अष्टविनायक दर्शन देखावा आरस करण्यात आली होती. सुपारी फोडणे, साखरपुडा व टिळ्याचा मॉडेल असा संगीतमय कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये साखरपुड्याच्या व टीळ्याच्या कार्यक्रमच्या शेवटी वधूवरांना स्त्रीभ्रूणहत्या करणार नाही व करून देणार नाही अशी शपथ देण्यात आली. ११.३० ते २.३० वाजेपर्यंत वऱ्हाडी मंडळींना रुचकर भोजन देण्यात आले. वधू वरांसाठी स्वतंत्र जानुसवाडे, स्वच्छता गृह अशा सुविधा पुरविण्यात आल्या.
वधुवारांकडून अत्याल्प रक्कम अकारून घेतलेल्या रकमेतून वऱ्हाडी मंडळी साठी जेवण, वधू वरांसाठी हार, गुच्छ, बाशिंगे, कळसतांब्या, हळद साहित्य, मामांचे फेटे, सुवासिनिचा सत्कार, नवरदेवांचे टोप, सुपारी फोडणाऱ्या व टिळा लावणाऱ्या मान्यवरांसाठी टोपी, टावेल, अक्षदा, कन्यादान विधी इत्यादी सुविधा पुरविण्यात आल्या.
प्रसंगी वधूवरांना शुभआशीर्वाद ह.भ.प.पंकज महाराज गावडे, माजी खासदार शिवाजी अढळराव पाटील, प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार संग्राम भैय्या जगताप, आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरददादा सोनवणे, वि.स.सा.कारखाना चेअरमन सत्यशीलदादा शेरकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक विश्वस्त मंगेश मांडे, कैलास मांडे, यांनी केले. सूत्रसंचालन माजी सरपंच जगन्नाथ कवडे यांनी केले. सामुहिक विवाह सोहळ्याचे नियोजन देवस्थान ट्रस्ट चे व्यवस्थापक व कर्मचारी यांनी केले.