Marathon : पुणे : दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आलेल्या जागतिक ‘कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत पुणे येथील रणजीत शिरोळे यांनी सहभाग घेऊन ठरलेल्या वेळेत पूर्ण केली आहे. या स्पर्धेत (८७.७ किलो मीटर) हे अंतर १२ तासाच्या आत पूर्ण करायचे असते. हे अंतर ११ तास २८ मिनीटे आणि ३८ सेकंदात शिरोळे यांनी पार केले. (Marathon)
दक्षिण आफ्रिकेच्या जवानांच्या स्मरणार्थ भरवली जाणारी जगातील ही सर्वात जुनी व सर्वात मोठी अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा आहे. मानाची स्पर्धा त्यांनी नुकतीच पूर्ण केली. यावर्षी सुमारे २० हजार स्पर्धकांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला होता. त्यापैकी ४०३ भारतीय स्पर्धक त्यामध्ये सहभागी झाले होते. (Marathon)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस रणजित शिरोळे त्यातील एक स्पर्धक होते. दर्बन ते पीटर्स मेरिटजबर्ग या दोन शहरा दरम्यान ८७० मीटर चढ असलेल्या मार्गावर ही स्पर्धा झाली. बारा तासांच्या आत ती पूर्ण करायची असते. या स्पर्धेदरम्यान सहा कट ऑफ दिलेले आहेत. (Marathon)
दरम्यान, कट ऑफ टाइमिंग नंतर एखाद्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यास स्पर्धकाला पुढे जाण्याची परवानगी नसते. शिरोळे यांनी ठरलेल्या वेळेत ही स्पर्धा पूर्ण केली. कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. अतुल गोडबोले यांचे प्रशिक्षण त्यांना लाभले. (Marathon)