पुणे: जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी निघालेल्या खासदार उदयनराजे भोसले यांनी अचानक यू टर्न घेतला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या निर्णयाने अनेकांच्या भूवया उंचावल्या असून चर्चेलाही उधाण आलं आहे. याबाबत एबीपी माझाने वृत्त दिले आहे.
सध्या उदयनराजे यांनी आता पुण्यात थांबा घेतला आहे. आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. त्यांनी ते बोलत आहे, तोपर्यंत चर्चेला येण्याचे आवाहन सरकारला केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे, पण राज्य सरकारकडून कोणताही निर्णय झालेला नाही.