युनूस तांबोळी
शिरूर(पुणे): प्राथमिक शिक्षण घेत असताना आपला पाल्य कोणते शिक्षण घेतो या बाबत पालकांना कोणतीच माहिती नसते. मुले शाळेत जातात हे पाहणे म्हणजे शिक्षण दिले असे नाही. शिक्षण घेऊन भविष्यात पाल्य करीयर घडविणार का? दर्जात्मक शिक्षण दिले जाणार का? शाळांमधील वेगवेगळ्या कार्यक्रमांना जाणे म्हणजे मुलांच्या भविष्याच्या शैक्षणिक धोरणांची माहिती होतेच असे नाही. राज्यात प्राथमिक मराठी शाळेचा पट कमी होत चालला आहे. पट कमी होणे म्हणजे शिक्षक कमी होणे. यातून शिक्षणाच्या दर्जा बाबत अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. असे मत माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
टाकळी हाजी ( ता. शिरूर ) येथील ग्रामविकास शिक्षण मंडळाचे बापूसाहेब गावडे माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालयातिल प्राचार्य आर. बी. गावडे यांच्या सेवापुर्ती निमित्त कार्यगौरव निरोप समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार पोपटराव गावडे होते.
यावेळी आमदार काशिनाथ दाते, ग्रामविकास शिक्षण मंडळाचे सचीव राजेंद्र गावडे, सहसचिव सुनिता गावडे, शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, भिमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदिप वळसे पाटिल, माजी सभापती मधुकर उचाळे, माजी सभापती प्रकाश पवार, गटशिक्षण अधिकारी बाळकृष्ण कळमकर, पंचायत समिती सदस्य सुभाष पोकळे, जिल्हा कृषी अधिकारी संजय पिंगट, माजी सभापती शशीकांत दसगुडे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख राम गावडे, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, वासुदेव जोरी, माजी मुख्याध्यापक आर. एस. कापसे, सतीष फिरोदिया, जय मल्हार हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनिल जाधव, सरपंच दत्ता जोरी, तज्ञ संचालक सोपान भाकरे, जनार्दन साबळे, प्रभाकर खोमणे, ग्रामविकास शिक्षण मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अजीत गावडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले की, राज्याच्या मंत्रीमंडळात नसलो म्हणून काय झाले. मंत्रीमंडळात एका खात्याची जबाबदारी घेऊन त्याची ध्येय धोरणे व योजना आखता येतात. मात्र सरकार ने तयार केलेल्या मित्रा कमेटीच्या माध्यमातून राज्यातील सर्व विभागाची ध्येय, धोरणे व योजना तयार करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्या सुखदु:खात सामिल होता येत नाही.
भविष्यात कृत्रीम बुद्धीमत्तेच्या जोरावर वेगवेगळ्या विभागाचा अभ्यास करून सरकारला सल्ला देण्याचे काम करावे लागणार आहे. त्यातून सरकार पुढील 10 वर्षाचे राज्याचे धोरण तयार करून विकासाचा व प्रगतीचा मार्ग आखणार आहे. या उन्हाळ्यात बंधाऱ्यात पाणी सोडले जाणार नाही. असा निर्णय झाला असताना देखिल उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी बंधाऱ्यात पाणी सोडले आहे. त्यामुळे बंधाऱ्यात पाणी दिसत असून आपन सध्या पिके वाचवू शकलो.
भविष्यात शेतकऱ्यांनी मोजून मापून पिके घेऊन उत्पादन घ्यावे. त्यामधून योग्य बाजारभाव व योग्य बाजारपेठ मिळण्याचे धोरण तयार करावे लागणार आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनाथ राऊत यांनी केले. सुत्रसंचालन ज्ञानेश्वर निचित यांनी केले तर आभार राजेंद्र गावडे यांनी मानले.