पुणे : मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा घेतेवेळी पिस्तूल रोखणे आणि मारहाण प्रकरणी मनोरमा खेडकर यांच्यावर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, मनोरमा खेडकर यांना पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना पुन्हा कोर्टात हजर केले असता त्यांनी तक्रारीचा पाढा वाचला. त्यावेळी त्यांनी कोठडीतील असुविधांविषयी कोर्टासमोर माहिती दिली. कोठडीत जेवण बेचव मिळत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. मात्र, पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला आहे.
काय म्हणाल्या मनोरमा खेडकर?
मनोरमा खेडकर म्हणाल्या, आपल्याला वेळेवर जेवण मिळत नाही, चहा तर सकाळी नऊ वाजता देण्यात आला. जेवण दुपारी दीड वाजता देण्यात आले. तसेच कोठडीतील जागा ओली असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. कोर्टाने या सर्व आरोपांची दखल घेतली असून कोठडीतील सीसीटीव्ही फुटेज मागितले आहेत.
तसेच सगळ्या गोष्टी वेळेवर देण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत. न्यायालय पुढील सुनावणीवेळी सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहे. दरम्यान, मनोरमा खेडकर यांच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ करण्यात आली असून सोमवारपर्यंत तपास पूर्ण करण्याच्या सूचना कोर्टाने पोलिसांना दिल्या आहेत.