पुणे: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील २ ऑगस्टला कोर्टात उपस्थितीत राहणार आहेत. जरांगे पाटील यांच्या वकिलांनी अटक वॉरंट इशू करू नये, यासाठी पुणे न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. दोन ऑगस्टला हजर होऊ, असं मनोज जरांगे पाटील यांच्या वकीलांकडून न्यायालयाला सांगण्यात आलं आहे. नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील आणि इतर दोन जणांच्या विरोधात मंगळवारी पुणे कोर्टाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते.