पुणे : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. आज ते पुण्यामध्ये असून यांच्या ‘मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीत मराठा बांधवाची हजारों संख्येने उपस्थिती दिसून येत आहे. यावेळी शांतता रॅलीमध्ये मनोज जरांगें पाटील यांचे भावी मुख्यमंत्री चे पोस्टर झळकले आहेत.
राज्यात मुख्यमंत्रीपदाची चर्चा आधूनमधून सुरुच असते. पुण्यात आज मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीमध्ये मनोज जरांगे भावी मुख्यमंत्री असा पोस्टर मराठा बांधवांनी हाती घेतल्याचे दिसून आले आहे, या शांतता रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. या मागणीसाठी त्यांनी महाराष्ट्रात शांतता रॅली देखील काढली आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर विधानसभेला तुमचे सर्व आमदार पाडणार, असा इशाराही मनोज जरांगे यांनी महायुतीला दिला आहे