( Manjari Crime News ) पुणे : भाजीपाला विक्रीच्या जागी पाणपोई लावण्यावरून वाद झाल्याने एका भाजीपाला विक्रेत्या ज्येष्ठ नागरिक महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मांजरी बुद्रुक ( Manjari Crime ) परिसरात घडली आहे. तसेच ताडपत्री ओढून महिलेला धकमी सुध्दा देण्यात आली आहे. २९ जानेवारी तसेच ६ मार्च या दोन दिवशी हा प्रकार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात घडला आहे.
हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल…
याप्रकरणी एका ६५ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून दत्ता ज्ञानोबा शिंगोटे याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ह्या भाजीपाला विक्री करतात. दरम्यान, दत्ता यास त्या ठिकाणी पाणपोई लाववायाची होती त्यामुळे त्यांनी येथे भाजी विक्रीस मनाई आहे असे म्हणून भाजी ठेवण्यासाठी लावलेली ताडपत्री ओढून महिलेला धमकी दिली. त्यानंतर ६ मार्च रोजी पुन्हा याठिकाणी चौघांनी येऊन आम्हाला येथे पाणपोई लावायची आहे असे म्हणाले.
त्यावेळी तक्रारदार महिलेने याला विरोध केला असता त्यांनी जातीवाचक बोलून शिवीगाळ केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
हडपसर टर्मिनल येथून रेल्वे गाड्या वाढविण्याचा प्रस्ताव विचाराधीन
Big Breaking : पुणे-सोलापूर डेमू ट्रेन आता हडपसरहून सुटणार..!