पुणे: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने खोतीदारांना मज्जाव केल्याने तीन तालुक्यातील शेतकऱ्यांचा लाखो रुपयांच्या मालाचे नुकसान होत आहे. याबाबत रयत शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिष्ठमंडळांने मांजरी उपबाजारात संचालक मंडळाला निवेदन दिले. तातडीने यावर निर्णय संचालक मंडळाने घेतला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी दिला.
मांजरी उपबाजारात खोतीदारांना परवानगी देण्याबाबत संचालक मंडळ अनुकूल असताना सुदर्शन चौधरी विरोध करत असल्याने शेतकऱ्यांनी संचालकांचा निषेध व्यक्त केला.आमच्या शेतातील माल काढण्यावाचून पडल्याने आमचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आम्हाला शेतात जनावरे सोडावी लागत आहेत. याबाबत तातडीने संचालक मंडळाने निर्णय घेतला नाही, तर आत्महत्या करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी मांजरी बाजार विभाग प्रमुख किरण घुले यांना दिला.
रयत शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामदास कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मांजरी उपबाजारात शिष्ठमंडळ घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी संचालक सुदर्शन चौधरी उपस्थित असताना त्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही.
यावेळी रयत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष रामदास पाटील बुवा कोतवाल, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हेमंत चौधरी, पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष महाडिक, पुणे जिल्हा अध्यक्ष पोपटराव महाडिक, पुणे जिल्हा सरचिटणीस टिके महाडिक, महिला अध्यक्ष कल्पना गव्हाणे पाटील, संपर्कप्रमुख शिरूर हवेली भानुदास शिंदे, हवेली तालुका उपाध्यक्ष आप्पा घोलप, यांच्यासह शेतकरी माजी सरपंच सचिन तुपे, यशवंत कारखान्याचे माजी संचालक महादेव धुमाळ, मंदार धुमाळ, माऊली माथेफोड, विलास जवळकर, शेखर काळभोर, लालूशेठ चावट, उपसरपंच गोकुळ ताम्हाणे, हनुमंत काळभोर, सूर्यकांत काळभोर, पोपट खेडेकर, विठ्ठल खेडेकर, अमृत काळभोर, नाना रुपनवर, आकाश गव्हाणे, आनंद काळभोर, दशरथ सातव, राजेंद्र खेडेकर, रामदास चौधरी, प्रदीप तावरे, दत्तात्रय काळभोर, बाळू काळभोर, यशवंत कानकाटे यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.