Manchar News शिरूर : या वर्षीच्या पावसाळ्यात मृग नक्षत्र लागण्यापुर्वीपासून हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज फुसका बार ठरला. (Manchar News) जिल्हातील शेतकऱ्यांना मृगातील दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. (Manchar News) मात्र अद्याप पाऊस न बरसल्याने शेतकरी आभाळाकडे टक लावून बसला आहे. (Manchar News) दरम्यान पाऊस नसल्याने बियाणे खरेदी – विक्री व अन्य साहित्याची खरेदी ठप्प असल्याने बाजारपेठेतील अर्थकारण मंदावले असल्याचे चित्र आहे. (Manchar News)
सध्या मान्सून केरळ पर्यंत मर्यादित आहे. अरबी समुद्रातील बिपरजॅाय वादळ धडकून गेले. या काळानंतर मान्सूनने राज्याकडे वाटचाल केली नाही. मान्सून मुंबईत दाखल झाल्यानंतर तो साधारण पुणे जिल्ह्याकडे येतो. जिल्हातील अनेक भागात सिंचनव्यवस्था असली तरी अनेक शेतकरी कोरडवाहू शेतीवर अवलंबून आहेत. त्यातून कोरडवाहू भागात पावसाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे निसर्गाच्या कृपेवर शेतकरी वर्ग अवलंबून आहे.
राज्यात मान्सून सक्रिय होत असल्याचे वेधशाळेकडून बोलले जात आहे. तसेच वाढत्या उन्हामुळे व दमट हवामानामुळे नागरिक व पशुपक्षी देखील त्रस्थ झाले आहेत. सुर्यप्रकाश प्रखर असल्याने शेतातील काडीकचरा जमा करून तो पेटवून देण्याचे काम शेतकरी भल्या पहाटे करताना दिसू लागला आहे. हवामान खात्याने यंदा सरासरी पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्पष्ट केला आहे.
यंदाचा पावसाळा समाधानकारक राहणार असला तरी गेल्या चार वर्षापासून मृग नक्षत्राचा पाऊस विलंबाने येत आहे. त्यामुळे जनावरांना चाऱ्याचे संकट येत असल्याने पाळीव जनावरांची संख्याही कमी प्रमाणात झालेली आहे. तथापि पाऊस सुरू न झाल्याने मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे.
कृषी केंद्रामध्ये विविध बियाणे दुकानात सजवून ठेवले असले तरी शेतकरी याकडे भटकत नसल्याचे चित्र आहे. अनेकवेळा बोगस बियाणे, किटकनाशके गैरमार्गाने विक्री होत असल्याने शेतकऱ्यांनी सावधानपूर्वक पक्के बिल घेऊनच बियाणे खरेदी करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे.
जिल्ह्यात सध्या मान्सून लांबणीवर गेला आहे. काही ठिकाणी तुरळक पाऊसाने हजेरी लावली असली तरी पेरणी योग्य पावसाची सगळीकडे प्रतिक्षा आहे. पेरणी योग्य पाऊस झाल्यास बीजप्रकिया करूनच पेरणी करावी. कृषी केंद्रामधून पक्के बिल घेऊनच बियांणाची व किटकनाशकांची खरेदी करा. प्रमाणित असणारे बियाणे घेऊन पेरणी करा. अधिक माहितीसाठी कृषी विभागाचा सल्ला घ्या.
देवदत्त निकम
(माजी सभापती, मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती )