Manchar News : मंचर, (पुणे) : उसने दिलेले पैसे मागितल्याच्या कारणातून निवृत्त पोलिसाची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकून दिल्याची खळबळजनक घटना पुणे जिल्ह्यातील मंचर येथे घडली आहे. याप्रकरणी मंचर पोलिसांनी २४ तासाच्या आत आरोपीला अटक केली.
पंढरीनाथ थोरात, (रा.मंचर, ता.आंबेगाव) असे हत्या झालेल्या निवृत्त पोलिसाचे नाव आहे. तर मच्छिंद्र पांडुरंग गुंजाळ असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याबाबत मुलगा संदिप थोरात यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
उसने दिलेले पैसे मागितल्याच्या कारणातून केला खून..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरीनाथ थोरात हे पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होते. २००३ मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली आणि ते पत्नी आणि मुलांसह गावी म्हणजेच पुणे जिल्ह्यातील मंचर या ठिकाणी राहून शेती करत होते. (Manchar News) थोरात हे रोज शेतात फेरफटका मारण्यासाठी जात, मात्र शेतात गेल्यानंतर रोज दुपारच्या दरम्यान जेवणासाठी ते दररोज घरी जेवणासाठी येत असत.
शनिवारी (ता. १७) दुपारी दुपारी ते घरी न आल्याने त्यांची पत्नी शांताबाई यांनी मुलगा संदीपला फोन करून वडील घरी आले नसल्याचे फोन वरून सांगितले. (Manchar News) मात्र संदीप बाहेर असल्याने त्यांनी त्यांचा चुलत भाऊ शिवाजी थोरात याला वडिलांचा शोध घेण्यास सांगितले. यावेळी शिवाजी थोरात आणि शांताबाई थोरात यांनी शेतामध्ये त्यांचा शोध घेतला असता त्यांच्या शेतातील विहिरीतच त्यांचा मृतदेह आढळून आला.
सदर ठिकाणी आरोपी हा खून करून पळून गेला होता. या आरोपीचा शोध घेण्यासाठी मंचर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश होडगर यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक किरण भालेराव यांनी एक पथक तयार करून घटनास्थळाचा पंचनामा केला. मिळालेल्या माहितीनुसार मृताने अनेक लोकांना उसने पैसे दिले होते, ते पैसे मागण्यासाठी गेले असता संबंधित लोक त्यांना दमदाटी करत असल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले होते.
दरम्यान, पोलिसांनी याच दिशेने तपास करून आरोपींचा शोध सुरू केला. याप्रकरणी मच्छिंद्र पांडुरंग गुंजाळ राहणार मंचर याचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. आरोपीची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने उसने दिलेले पैसे मागितल्याच्या कारणातून हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.(Manchar News) या घटनेचा तपास करुन खुनातील आरोपीस मंचर पोलीसांनी २४ तासाच्या आत अटक केली आहे.