शिक्रापूर : शिरूर शहरातील बाबूरावनगर येथे पोलीस भरती प्रशिक्षण घेणाऱ्या युवतीचा पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना घडली. याबाबत पीडित युवतीने शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने पोलिसांनी अजय भाऊसाहेब येवले (रा. अन्नापूर ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शिरुर शहरातील बाबुरावनगर येथे पोलीस भरती प्रशिक्षण घेणारी युवती प्रशिक्षणासाठी येत असताना अजय येवले वारंवार युवतीचा पाठलाग करुन युवतीच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे वर्तन करु लागला. तसेच युवती प्रशिक्षणाबाबत सराव करत असताना सदर ठिकाणी लाल रंगाच्या कारमधून वारंवार येथून प्रशिक्षणार्थी मुलांकडे युवतीबाबत चर्चा करून युवतीला त्रास दिला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उमेश भगत हे करत आहेत.