शिक्रापूर : घरासमोर काम करीत असलेल्या महिलेच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे कृत्य करणाऱ्याविरुध्द शिरुर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कांतीलाल बळवंत वाबळे (रा. पिंपळसुटी ता. शिरुर जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पिंपळसुटी (ता. शिरुर) येथे हा प्रकार घडला. महिला घरासमोर काम करत असताना कांतीलाल वाबळे याने महिलेच्या समोर येऊन महिलेच्या मनास लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले.
त्यांनतर महिला तिच्या पतीसोबत गावात जात असताना पुन्हा कांतीलाल याने त्याच्या दुचाकीहून महिलेच्या जवळ येऊन दुचाकी उभी करत महिलेच्या मनास लज्जा निर्माण होणारे कृत्य केले. याबाबत पीडित महिलेने शिरुर पोलिसांत तक्रार दिल्याने पोलिसांनी कांतीलाल वाबळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संपत खबाले हे करत आहेत.