पिंपरी: कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करत तरुणाला लुटण्याची घटना बुधवारी ३१ जानेवारीला पिंपरी येथे घडली. तसेच हवेत कोयते फिरवून दहशत पसरवण्यात आली. हिरालाल श्रीमिसरी मंडल (वय 32 रा.पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लहुया बहोत (रा. पिंपरी), राहुल्या लखन (रा.पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नेहमी प्रमाणे त्यांच्या हमालीचे काम करत असताना आरोपी तिथे आले व त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी फिर्यादीच्या खिशातून 950 रुपये देखील काढून घेतले. तसेच कोयता दाखवून कोणाला काही सांगितले, तर याद राख अशी धमकी दिली. यावेळी इथे लोक जमा झाले असता आरोपींनी हवेत कोयता फिरवून दहशत निर्माण केली. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.