बारामती: बारामती शहरात मानव जातीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली. सावत्र पित्याने अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यातून मुलीला दिवस गेल्यानंतर ही गंभीर घटना उघडकीस आली. पीडित मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पीडितेच्या आईशी आरोपीने दुसरा विवाह केला आहे. सध्या हे कुटुंब शहरात एकत्र राहते.
मुलीची आई पहाटे लवकर उठून अंगण झाडण्यासाठी घराबाहेर जात होती. याचा फायदा घेत जुलै २०२४ पासून सावत्र बाप तिच्या अंथरूणात शिरून तिच्याशी तिचे तोंड दाबून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत होता. जुलैपासून ते सप्टेंबरपर्यंत त्याने दोन-तीनदा तिच्याशी शारीरिक संबंध केले. त्यातून ही १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. याबाबत तू कोणाला काही सांगितले, तर तुझ्या आईला व तुला जिवे मारून टाकीन, अशी धमकी तो पीडितेला देत होता. पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संध्याराणी देशमुख अधिक तपास करत आहेत.