शिक्रापूर : एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीला टीव्ही दाखवण्याचे आमिष दाखवत नराधमाने बालिकेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना पिंपरखेड (ता. शिरुर) येथे घडली. याबाबत पीडित मुलीच्या आईने शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी संतोष रंगनाथ गोफणे (रा. पिंपरखेड ता. शिरुर जि. पुणे) याला अटक केली आहे.
अल्पवयीन बालिका घरासमोर खेळत असताना गावातील संतोष गोफणे याने बालिकेला टीव्ही दाखवतो, असे आमिष दाखवून त्याच्या घरी घेऊन जात बालिकेवर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यांनतर बालिकेने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितल्याने अत्याचाराचा प्रकार समोर आला.