शिरूर (पुणे) : सुनेशी झालेल्या कौटुंबिक वादातून तिघांनी केलेल्या मारहाणीत एका इसमाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शिरूर शहरातील होलमिल बेकरीजवळ डांबरी रस्त्यावर गुरुवारी (दि. १) घडली. याप्रकरणी रेहाना मेहबूब सय्यद (वय ३३, रा. उबाळे नगर, वाघोली) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सून अंजली रुवल काळे हिच्याशी झालेल्या कौटुंबिक वादातून वसंत दिलीप भोसले (वय ४३, रा. पाण्याच्या टाकीजवळ, शिरूर) यांच्यावर नागरेश बाजीराव काळे, राजेश बाजीराव काळे व निघू बाजीराव काळे (सर्व रा. पाण्याची टाकीजवळ, शिरूर) यांनी उलट्या बाजूने कोयत्याने छातीत व पायावर मारहाण केली होती. या मारहाणीत भोसले यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी वसंत भोसले यांच्या मृत्यूस कारणीभूत असेलल्या सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतीराव गुंजंवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उगले हे करीत आहेत.