पुणे : पीएमपी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील टाटा गार्डन चौकात घडली. या प्रकरणी पीएमपी चालकाविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अशोक देवबहादुर घर्ती (वय ३२, रा. आनंद पार्क, गणेशनगर, वडगाव शेरी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी पीएमपी चालक रवींद्र गेनबा गायकवाड (वय ४०, रा. धनकवडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अशोक घर्ती यांचा भाऊ गोपाल (वय ३३) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार अशोक घर्ती बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास नगर रस्त्यावरून निघाला होता. चंदननगर भागातील टाटा गार्डन चौकात भरधाव पीएमपी बसने घर्ती यांना धडक दिली.