कामशेत: मुंबई-पुणे लोहमार्गावर कामशेत शहराच्या हद्दीत डाऊन लाईनवर रेल्वेच्या धडकेने अज्ञात इसमाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस फौजदार संजय तोडमल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. ११) मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास कामशेत शहराच्या हद्दीत रेल्वे किलोमीटर नंबर १४३/३६ च्या जवळ गाडीखाली येऊन ४० ते ४५ वर्षाच्या इसमाचा मृत्यू झाला. मजबूत बांधा, गोरा रंग, गोल चेहरा बारीक व काळे केस उंची सुमारे साडेपाच फूट उजव्या हातावर बदामात इंग्रजीत एस असे गोंदलेले आहे. या व्यक्तीच्या अंगात डार्क निळ्या रंगाचा टी-शर्ट, काळ्या रंगाची फॉर्मल पॅन्ट घातलेली असून या संदर्भात कोणाला ओळख पटल्यास तळेगाव दाभाडे लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.