शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील भीमा नदीमध्ये काही इसम मासेमारी करण्यासाठी गेले असता त्यांना पाण्यामध्ये एका इसमाचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार श्रावण गुपचे, पोलीस शिपाई अंकुश चौधरी, पोलीस पाटील जयसिंग भंडारे यांसह आदींनी घटनास्थळी जात पंचनामा केला असता अंगात राखाडी टी शर्ट असलेल्या व अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाच्या इसामचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. इसामाबाबत काहीही माहिती असल्यास शिक्रापूर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले केले आहे.