शिक्रापूर: एका इसमाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. निशिकांत कृपासिंग बारीक (वय ४५ रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. नयागाव ता. चांदबरी जि. भद्रक ओडीसा) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत राजेश सुरेंद्र बारीक (वय २३ रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. नयागाव ता. चांदबरी जि. भद्रक ओडीसा) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील निशिकांत बारीक हे सकाळपासून घरी नसल्याने त्यांचा पुतण्या राजेश हा त्यांचा शोध घेत होता. सायंकाळच्या सुमारास निशिकांत यांनी संभाजी कांचन यांच्या घराच्या पाठीमागे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र पाटील हे करत आहेत.