शिक्रापूर : शिक्रापूर येथील एका इसमाला ट्रेडिंगमध्ये ऑनलाइन पैसे गुंतवण्यास लावून नंतर व्हाटसअॅप ग्रुपवर कंपनीच्या चालकाला आलेली बनावट ईडीची नोटीस दाखवत त्याला अटक झाल्याचे भासवून अजूनही पैसे भरण्याचा तगादा लावून फसवणूक केली.
गणेश रेंगास्वामी व सात्विक भानोत या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील गणेश लोके (वय ३४ रा. इको व्हिला सोसायटी, शिक्रापूर) हे एका कंपनीत नोकरीला असून ते ऑनलाईन गुंतवणूक करण्याची माहिती घेत असताना त्यांना एका अॅपची माहिती मिळाली. त्यांनतर त्यांनी त्यानुसार संबंधित नंबरवर फोन करुन वीस हजार रुपये पाठवले. दरम्यान त्यांना व्हाटसअॅप ग्रुपवर जॉईन केले.
त्यांनतर ग्रुपवरील मुख्य व्यक्तीने गणेश यांना अनेक लोकांना चांगला परतावा मिळाल्याचे भासवले. लगेचच सात्विक भानोत याने कंपनीचे मुख्य गणेश रेंगास्वामी यांना ईडीची नोटीस आल्याचे दाखवून त्यांना अटक झाल्याचे भासवले आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही पैसे भरा असा तगादा लावला. दरम्यान गणेश लोके यांना संशय आल्याने त्यांनी पैसे भरले नाही, त्यांनतर आपली फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने फिर्याद दिली.