पुणे : तुम्हाला पार्ट टाईम जॉब करायचा आहे का? आम्ही यूट्यूबचे एजंट आहोत, अशी खोटी बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 12 लाखांची फसवणूक झाली. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात तिघांविरोधात बुधवारी (ता.3) गुन्हा दाखल करण्यात आला.
समीर सुधाकर शहाणे (वय 54, रा. शिवाजीनगर) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, फरीदा, लैला आणि अलेक्झांडर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार हा 24 मार्च 2023 ते 3 एप्रिल 2024 यादरम्यान घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन करून यूट्यूब मार्केटिंग एजन्सीमधून बोलत आहे. तुम्हाला पार्ट टाईम जॉब करायचा आहे का? अशी विचारणा केली. फिर्यादींनी होकार दिल्यावर त्यांना वेगवेगळी कामे करण्यास सांगितले. मात्र नफा दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली.