शिक्रापूर : शेतीच्या वादातून मुलाने आपल्या जन्मदात्या बापाला मारहाण केली. ही घटना केंदूर (ता. शिरुर) येथील पहाडवाडी येथे घडली. याबाबत रंगनाथ रामचंद्र पहाड (वय ७६ रा. केंदूर पहाडवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रमेश रंगनाथ पहाड (रा. केंदूर पहाडवाडी ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रंगनाथ पहाड हे त्यांच्या शेतात ट्रक्टरच्या सहाय्याने मशागत करत असताना त्यांचा मुलगा रमेश शेतात आला. त्याने वडील रंगनाथ यांना शिवीगाळ, दमदाटी करत तुम्ही शेतात यायचे नाही, येथे काही करायचे नाही असे म्हणून लाकडी काठीने मारहाण करत ट्रक्टरचालकाला शेतातून हकलून देऊन वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.