पिंपरी : केस कापण्यावरून चिडवत असल्याचा विरोध केल्याने एकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या प्रकरणी रविवारी (दि.११) रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जितेंद्र सदाशिव शिंदे (वय ४५ रा. माळवडी) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नबीलाल शब्बीर सय्यद (वय ३२ रा. पुनावळे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ७ ऑगस्ट रोजी सकाळी पुनावळे येथे घडली. फिर्यादी हे केस कापून थांबले असताना आरोपीने फिर्यादीला चिडवण्यास सुरुवात केली. फिर्यादीने त्याला विरोध केला असता आरोपीने लोखंडी रॉडने मारहाण केली. फिर्यादीचा पुतण्या अविनाश याला देखील जीवे मारण्याची धमकी दिली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.