पिंपरी: थेरगाव येथील एका तरुणावर कोयत्याने वार करत टोळक्याने हवेत कोयता फिरवून दहशत निर्माण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सोमवारी 29 जानेवारीला दुपारी थेरगाव येथील बारणे चाळ येथे घडली. याप्रकरणी आनंद सुभाष जेवूरकर (वय 29 रा.थेरगाव) यानी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अखिल उर्फ आदेश सुधीर बाबर आणि त्याचे इतर दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आनंद जेवूरकर हे कामावरून येऊन त्यांच्या मित्रांसोबत चाळीजवळ गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी हे दुचाकीवरून आले. त्यांनी फिर्यादीला लाथा बुक्क्यांनी माराहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी जेवूरकर यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपीने त्याच्या कंबरेचा कोयता काढून आरोपीवर वार केले. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. यावेळी आरोपींनी हातातील कोयता फिरवत कोणी मध्ये आले तर जीवे मारून टाकू, अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली. यावरून वाकड पोलिसांनी आरोपीवर खूनाचा प्रयत्न व बेकाया शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.