पुणे: पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच चालली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये गोळीबाराच्या चार घटना घडल्या आहेत. अशातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली. हातात कोयता घेऊन काही तरुणांनी दहशत पसरलवल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओही देखील पुढे आला आहे. या घटनेने शहरातील बिबेवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बिबेवाडी परिसरात केवळ 40 रुपये उधार ठेवले नाहीत म्हणून गुंडांकडून कोयत्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. यामधील गुन्हेगार हा रेकॉर्डवरील असून काही दिवसांपूर्वीच तो जेलमधून बाहेर आला आहे. बिबवेवाडी पोलिसांचे या गुंडाकडे दुर्लक्ष झालं असून घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
केतन टेमघर असं या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर खुनाच्या गुन्ह्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हेगाराची बिबेवाडी आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर दहशत पसरली आहे. पुणे पोलीस आयुक्तांच्या आदेशाला आणि त्यांनी काढलेल्या परेडला गुंडांकडून केराची टोपली दाखवण्यात येत आहे. शहरात राजरोसपणे गोळीबार आणि कोयत्याच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत.