पिंपरी: मोशी परिसरात स्पा सेंटरच्या नावाने सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका महिलेची सुटका केली असून स्पा मॅनेजरला बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई गुरुवारी 18 जानेवारीला रात्री दहाच्या सुमारास केली आहे.
विशाल तानाजी माने (वय-26 सध्या रा. जाधववाडी पुणे, मुळ रा. मु.पो. बीदाल ता. माण जि. सातारा) याला अटक केली आहे. तर केशव ज्ञानोबा वाघमारे (वय-38 रा. जाधववाडी, मोशी) आणि एका महिलेवर भादवि कलम 370 (3), 34 सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस नाईक गणेश सिताराम कारोटे (वय-36) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोशी येथील स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी ग्राहक पाठवून खात्री करुन घेत स्पा सेंटरवर छापा टाकून एका महिलेची सुटका करुन स्पा मॅनेजर विशाल माने याला अटक केली. आरोपी पीडित महिलेला पैशांचे आणि दाखवून तिच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होते. यातून मिळणाऱ्या पैशातून ती स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे करीत आहेत.