शिक्रापूर (पुणे): खुनाच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर जामिनावर बाहेर येताच पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या युवकास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. बबलू ऊर्फ अभिजित चक्रधर पहाड (वय २५, रा. पहाडवाडी, केंदूर, ता. शिरुर, जि. पुणे) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई प्रतीक जगताप यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
केंदूर (ता. शिरूर) येथे बबलू ऊर्फ अभिजित पहाड याने डिसेंबर २०२१ मध्ये जुन्या वादातून पप्पू उर्फ निलेश विष्णू पहाड या युवकाचा खून केला केल्याचा संशय आहे. दरम्यान, नुकतेच न्यायालयाने बबलुला जामिनावर सोडले होते. मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर बबलू हा जवळ पिस्तूल बाळगून फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांना मिळाली.
त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, पोलीस नाईक विकास पाटील, रोहिदास पारखे, बापू हाडगळे, पोलीस शिपाई प्रतिक जगताप, जयराज देवकर, निखील रावडे, किशोर शिवणकर यांनी केंदूर येथील पहाडवाडी येथे सापळा रचून बबलू उर्फ अभिजित याला त्याच्या जवळील कार व पिस्तुल सह जेरबंद केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व व पोलीस नाईक रोहिदास पारखे हे करत आहेत.