शिरूर : शिरुर शहराबाहेर असलेल्या पुणे नगर बाह्यवळण मार्गावर एका टपरीजवळ एक तरुण कमरेला गावठी पिस्तूल लावून उभा होता. गस्तीवरील पोलीस पथकाने त्याला सापळा रचून ताब्यात घेत अटक केली आहे. सदर घटना बुधवार (दि. ८) रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.
पुणे-नगर बाह्यवळण मार्गावर सुनिल वडेवाले टपरी जवळ निखिल सतिश थेऊरकर (वय.२१ रा. करडे ता. शिरुर) हा तरुण कमरेला गावठी पिस्तूल लावून उभा होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक गस्त घालत असताना गुप्त बातमीदाराकडून याबाबत त्यांना माहिती मिळाली होती. त्यामुळे या पथकाने या तरुणाला सापळा लावून या तरुणाला पकडले आहे. त्याच्यावर आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन एक गावठी पिस्तुल, दोन जिवंत काडतूस असा ४१ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे