माळेगाव : यावर्षी पर्जन्यमान चांगले झाले असून, ‘माळेगाव’ने चालू हंगामात १५ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, सभासद व कामगारांच्या सहकार्याने गाळप हंगाम यशस्वी होईल, असा विश्वास अध्यक्ष अॅड. केशव जगताप यांनी व्यक्त केला. सहकारातील अग्रेसर असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशव जगताप व त्यांच्या पत्नी शांताबाई यांच्या हस्ते झाला. या वेळी कार्यकारी संचालक अशोक पाटील, उपाध्यक्ष तानाजी देवकाते, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, तानाजी कोकरे, योगेश जगताप, मदन देवकाते, राजेंद्र ढवाण उपस्थित होते.
अध्यक्ष अॅड. केशव जगताप म्हणाले की, माळेगावच्या सभासदांना उच्चांकी ३६३६ रुपये दर दिला आहे. तर कामगारांना २५ टक्के बोनस दिला आहे. चालू हंगामात १५ लाख मेट्रिक टन ऊस उत्पादन करण्यात येणार आहे. सदरचा हंगाम यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, ज्ञानदेव बुरुंगले, संतोष जाधव, सुरेश देवकाते, अशोक तावरे, इंद्रसेन आटोळे, दशरथ राऊत, प्रकाश देवकाते, राजेंद्र तावरे यांनी मनोगत व्यक्त केले.