पुणे : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात रविवारी (ता. ११) मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड मराठा समाज पुणे जिल्हा यांच्यातर्फे आयोजित रॅलीची सुरुवात दुपारी १२ वाजता शहरातील सारसबाग येथून होणार आहे, तर डेक्कनच्या खंडुजी बाबा चौकात संध्याकाळी ६ वाजता समारोप होणार आहे.
दरम्यान, मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीसाठी होणारी गर्दी लक्षात घेत शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. शांतता रॅली जशी पुढे जाईल त्याप्रमाणे मागील चौक वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली आहे.
असे असतील वाहतुकीत बदल?
- मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली सुरू झाल्यानंतर नवले पुलाकडून येणारी वाहतूक नवीन बोगद्याकडे वळविण्यात येणार आहे.
- तर खडीमशीन चौकातून जड वाहने कात्रजकडे न सोडता बोपदेव घाटाकडे वळविण्यात येतील.
- कात्रज चौक ते होल्गा चौक येणारी वाहतूक रॅली पुढे जाईल तशी सुरू करण्यात येणार आहे.
- जेधे चौक ते सिंहगड रस्त्यावरील वाहतूक व्होल्गा चौक, मित्रमंडळ चौक व सावरकर चौक अशी असणार आहे.
- दांडेकर पूल – सिंहगड रस्त्यावरून येणारी वाहतूक दांडेकर पूल, सावरकर चौक, मित्रमंडळ चौक व व्होल्गा चौक अशी वळविली आहे.
- निलायम पूल – सावरकर पुतळ्याकडे वाहतूक बंद राहील
- ना. सी फडके चौक – सणस पुतळ्याकडे वाहतूक बंद राहील
- एस पी कॉलेज चौक पूरम चौकाकडे वाहतूक बंद राहील
- शिवाजी रस्ता – राष्ट्रभूषण चौकाद्वारे वाहने वेगा सेंटरमार्गे जातील
- सेव्हन लव चौक – जेधे चौकाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील.
- वाहने मार्केटयार्ड किंवा पुणे स्टेशनकडे नेहरू रस्त्याने सोडली जातील
- मार्केटयार्ड जंक्शन – जेधे चौकाकडे वाहतूक बंद राहील. वाहने वखार महामंडळ मार्गे सोडली जातील
- पंचमी चौक – पंचमी चौक ते जेधे चौकाकडे वाहतूक बंद राहील. वाहने पंचमी ते शिवदर्शन चौक, शिवदर्शन ते गजानन महाराज मंदिर चौक ते निलायम टॉकीज मार्गे सोडली जातील
- शिवदर्शन चौक – मित्रमंडळ चौकाकडे वाहतूक बंद राहील