हडपसर : स्मितसेवा फाउंडेशन आयोजित महिलांसाठी मोफत ‘सेल्फ मेक अप प्रशिक्षण वर्ग ‘ व ‘ महिला बचतगटामार्फत घरगुती व्यवसाय सुरू करण्यासाठी संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन वर्ग’चे आयोजन भाजपा ओबीसी मोर्चा पुणे शहर सरचिटणीस व स्मितसेवा फाउंडेशन अध्यक्षा स्मिताताई तुषार गायकवाड यांनी यशराज ग्रीन कॅसल सोसायटी, काळे पडळ, हडपसर येथे केले.
यावेळी उपस्थित महिलांना व्यवसाय मार्गदर्शन भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेश पदाधिकारी डॉ. पी. टी. काळे यांनी केले. सेल्फ मेक अप प्रशिक्षण वर्ग उज्वला ढवळे यांनी घेतला. यामध्ये स्वतःचा मेक अप कसा करावा, ट्रेडिशनल महाराष्ट्र लुक, सारी ड्रेपिंग, हेयर स्टाइल, प्रोडक्ट नॉलेज, फेशिअल डेमो घेण्यात आले.
परिसरातील महिलांनी उत्सूर्तपणे या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. यावेळी यशराज ग्रीन कॅसलचे चेअरमन अमोल नागोवडे व रूपाली नागोवडे यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमात अंजली शहा, अश्विनी वाघ, संगीता हरपळे, साक्षी सूर्यवंशी व इतर स्मितसेवा फाऊंडेशन सदस्य आणि परिसरातील महिला उपस्थित होत्या.