पुणे : उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग केले. या फायरिंगमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक जिल्हाप्रमुख महेश गायकवाड जखमी झाले. मात्र, या गोळीबारावेळी महेश गायकवाड यांच्याकडेही रिव्हॉल्वर होते. या झटापटीत त्यांना ते बाहेर काढता आले नाही, या अजित पवार यांच्या गौप्यस्फोटांमुळे खळबळ उडाली आहे.
अजित पवार यांनी आज पुणे विमानतळाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. या वेळी अजित पवार यांना घोसाळकर गोळीबार प्रकरण आणि याआधीच्या गुन्हेगारीच्या घटनांवरुन विरोधक राजीनामा मागत असल्याबाबत विचारणा करण्यात आली. यावर अजित पवार म्हणाले की, “उल्हासनगमध्ये जरी सत्ताधारी पक्षाचे आमदार असले तरी कारवाई ताबडतोब झाली. जमिनीच्या व्यवहारातून हा गोळीबार झाला. एक नागरिक म्हणून पोलिसांचे काम कौतुकास्पद वाटते. आत गोळ्यांचा आवाज आल्यानंतर, एकाच्या हातात रिव्हॉल्वर असताना देखील आणि दुसऱ्याकडेही रिव्हॉल्वर होते. त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला, पण तो त्या झटापटीत त्याला काढता आल् नाही. नाहीतर आणखी वेगळे चित्र दिसले असते. गोळीबाराच्या आवाजानंतर पोलीस आले, त्यांना पकडलं आणि जखमीला ताबडतोब हॉस्पिटलला नेले. आता तो या धक्क्यातून बाहेर निघाला आहे.
या संपूर्ण घटनेत सत्ताधारी पार्टीचा आमदार असा विचार न करता दोषींना अटक केली आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. ता. त्यातूनच अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाल्याचा आरोप आहे.