Mahebub Pansare : जेजुरी, (पुणे) : जेजुरी नगरपरिषदेचे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक महेबुब पानसरे यांच्यावर चार ते पाच जणांनी कोयता कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वनेश प्रल्हाद परदेशी, किरण वनेश परदेशी, स्वामी वनेश परदेशी आणखी दोघेजण अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मेहबूब पानसरे यांची नाझरे धरण परिसरात शेती आहे. मेहबूब पानसरे यांचे वनेश परदेशी यांच्यात शेतजमिनीबाबत जुना वाद सुरू होता. दरम्यान पानसरे शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शेतातील मशागतीचे काम पाहण्यासाठी गेले होते. यावेळी पाच जणांनी मेहबूब पानसरे आणि इतर दोघांवर कुऱ्हाड आणि कोयत्याने वार केले.
या घटनेत पानसरे हे गंभीरित्या जखमी झाले होते. त्यांनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी पुणे येथील रुग्णलयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनीपाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या प्रकरणी वनेश प्रल्हाद परदेशी, किरण वनेश परदेशी, स्वामी वनेश परदेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शेतजमिनीच्या वादातून पानसरे यांची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान मेबबुब पानसरे हे राष्ट्रवादीच्या खासदार आणि कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय मानले जातात.