Maharashtra Weather Update : पुणे : भारतीय हवामान विभाग नुसार, देशातील काही भागात पाऊस आणि वादळाची शक्यता आहे. पश्चिम हिमालयीन भागात झालेल्या बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. दिल्लीतही तापमानात घसरण्यास सुरूवात झाली असून थंडीचा जोर वाढला आहे. राज्यात गेले काही दिवस अनेक जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यासह देशात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. दरम्यान, मुंबईसह, पुणे, सातारा आणि कोकण किनारपट्टी भागात काही ठिकाणी रविवारी तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. दुपारी मात्र उन्हाचा चटका बसत होता.
राज्यात पुढील 24 तासांत पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यासह देशात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. राज्यासह देशात विविध ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. राज्यात थंडी पडण्यास सुरुवात झाली असून नोव्हेंबरच्या शेवटी थंडीचा जोर वाढणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.