पुणे : बारामती विधानसभा मतदार संघाकडे साऱ्या देशाचे लक्ष लागुन राहिलेल्या लक्षवेधी लढतीत अजित पवार यांनी दहाव्या फेरी अखेर 50 हजाराचे लीड घेतले. याविजयामुळे डोर्लेवाडीकरांनी गुलाल, फुलांची उधळण करीत फटाके फोडत जल्लोषात साजरा केला.
मागील काही दिवसांपासून सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा निवडणुकीत घड्याळ चालणार की तुतारी असे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे आज सकाळ पासुन मतमोजणी कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. त्यामुळे आज डोर्लेवाडी येथे चौका चौकात तरुणाईसह सर्वच जण निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष देवुन होते. सर्वांचे मोबाईल मध्ये येणाऱ्या निकालाकडे लक्ष होते.
या निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पुतणे व राष्ट्रवादी (शरद पवार)चे उमेदवार युगेंद्र पवार यांच्याविरोधात आघाडी घेतली आहे. अजित पवार महाराष्ट्र विधानसभेची ही निवडणूक बारामती मतदारसंघातून लढवत आहेत आणि पवार कुटुंबीयांच्या बालेकिल्ल्यात आपल्या पुतण्याविरुद्ध विजय मिळवून आठव्यांदा विजयी होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यामुळे डोर्लेवाडीमध्ये तरुणाईचा सकाळ पासुन गुलाल उधळत फटाके फोडत एकच जल्लोष केला.
“एकच वादा अजित दादा” महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व बारामती विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजित पवार यांच्या समर्थकांनी फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला आहे. ‘बारामतीकरांचा एकच दादा अजितदादा अजितदादा’, ‘एकच वादा अजितदादा’, ‘अजितदादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणा देत त्यांनी आनंद साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे झेंडे घेऊन जोरदार जल्लोष केला. त्यामुळे बारामतीत निकालाआधीच अजित पवारांच्या विजयाचा उत्सव गुलाल उधळून आणि घोषणाबाजी करीत साजरा केला.