लोणीकंद : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे घेण्यात येणारी ६६ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ६ ते १० नोव्हेंबरला नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा फुलगाव (ता. हवेली) या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. यंदाच्या केसरी स्पर्धेत ४७ संघातील ९०० हून अधिक मल्ल सहभागी होणार आहेत, अशी माहिती पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे यांनी दिली.
पुढे बोलताना भोंडवे म्हणाले, पुणे जिल्ह्यातील पूर्व हवेलीमध्ये ही स्पर्धा दुसऱ्यांदा होत आहे, या पूर्वी देखील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन लोणीकंद या ठिकाणी झाले होते. यावर्षी या स्पर्धेचे आयोजन फुलगावतील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या प्रशस्त अशा मैदानामध्ये होत असून, या स्पर्धेचा आनंद पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र घेणार आहे.