पळसदेव (पुणे): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे सहाय्यक आयुक्त धनाजी बुटे पाटील यांचे शनिवार (दिनांक ५ एप्रिल) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील करेवाडी हे त्यांचे मूळ गाव आहे.
धनाजी बुटे पाटील यांनी बार्शी, अहिल्यानगर येथे प्रशासन अधिकारी म्हणून आपली सेवा बजावली. तसेच पुणे जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी म्हणूनही ते काही काळ कार्यरत होते. त्यांनी सर्वाधिक काळ पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात अधिकारी म्हणून काम केले . काही महिन्यांपूर्वी त्यांची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद येथे सहाय्यक आयुक्त म्हणून पदोन्नतीने बदली झाली होती. सर्वांशी मिळून मिसळून राहणारे, हसतमुख आणि सुस्वभावी अधिकारी म्हणून बुटे पाटील यांची ओळख होती.