पुणे : राज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. या निवडणुकीत नेतेमंडळी एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. मतदानाचा दिवस जसा-जसा जवळ येत आहे, तसा तसा प्रचाराला वेग येत आहे. यादरम्यान राजकीय नेत्यांसोबत असणाऱ्या बॅगेची तपासणी देखील केली जात आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती येथे हेलिकॉप्टर आणि बॅगेची तपासणी करण्यात आली आहे. अजित पवारांनी आपल्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे.
व्हिडीओमध्ये काय दिसत आहे?
हा व्हिडीओ हेलिकॉप्टरमधून शूट करण्यात आला आहे. हेलिकॉप्टरबाहेर उभे असलेले अधिकारी सीटवर ठेवलेली अजित पवारांची बॅग तपासत आहेत. अधिकारी बॅगमधील सामान तपासत असताना अजित पवार समोरच्या सीटवर बसले असून मोबाईलवर बोलत आहेत. अजित पवार हे एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हाताने बॅग उघडून देत कर्मचाऱ्यांना बॅगमध्ये काय आहे हे दाखवत असल्याचे दिसत आहे. यावेळी एका बॅगेत चकल्या होत्या. बॅगेत चकल्या हातात घेऊन खा-खा बाबा…सगळ्या बॅगा तपास…त्या डब्यात पैसे आहेत का चेक कर…असं अजित पवार अधिकाऱ्यांना बोलताना दिसले.
दरम्यान, उद्धव ठाकरेंची बॅग सोमवारी यवतमाळमध्ये हेलिपॅडवर तपासण्यात आली. त्यानंतर मंगळवारी ठाकरेंची बॅग लातूरच्या औसा येथील हेलिपॅडवर तपासण्यात आली. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगेची देखील तपासणी झाली.
Today, while on my way for election campaigning, the Election Commission conducted a routine check of my bags and helicopter. I fully cooperated and believe that such measures are essential to ensure free and fair elections. Let us all respect the law and support efforts to… pic.twitter.com/lVDUPh174u
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 13, 2024